Home पुणे “राज ठाकरे यांचे चाहते हेच त्यांचं कवच, सरकारने डोकं ठिकाणावर ठेवावं”

“राज ठाकरे यांचे चाहते हेच त्यांचं कवच, सरकारने डोकं ठिकाणावर ठेवावं”

पुणे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसे अधक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत राज्य सरकारने कपात केली आहे. यावर मनसे नेत्या रूपाली पाटील ठोंबर यांनी प्रतिक्रिया देत सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

राज ठाकरे यांचे लाखो चाहते हेच त्यांचं कवच आहे. सरकारने डोकं ठिकाणावर ठेऊन काम करावं, नाहीतर त्यांची अवस्था भाजपसारखी होईल, असा इशारा रुपाली पाटील यांनी यावेळी दिला. तसेच राज ठाकरे यांची झेड (Z) दर्जाची सुरक्षा काढून घेऊन त्यांना वाय (Y+) दर्जाची सुरक्षा दिली आहे., असं रूपाली पाटील म्हणाल्या.

दरम्यान, राज ठाकरेंची झेड सुरक्षा कमी करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले. सरकारला सत्तेत आल्यापासून याच खेळी खेळायला का आवडतात? राज ठाकरे हे महाराष्ट्रातील एक दिग्गज नेते आहेत. शरद पवार, राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांची सुरक्षा कमी करुन त्यांचं महत्त्व कमी असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करत असाल, तर मोठी चूक करत आहात, असंही रूपाली पाटील म्हणाल्या.

 महत्वाच्या घडामोडी-

नितेश राणेंना फडणवीस तुरूंगात टाकणार होते, पण…; शिवसेनेचा मोठा गाैफ्यस्फोट

गरज नसल्यास माझी सुरक्षाही कमी करा- शरद पवार

सुरक्षा हटवल्याने आम्ही हादरून जाऊ असं नाही- रावसाहेब दानवे

“लोकप्रतिनिधींना सुरक्षेची गरज नाही, राज्य सरकारने हीच सुरक्षा जनतेला आणि महिलांना द्यावी”