Home महाराष्ट्र सुरक्षा हटवल्याने आम्ही हादरून जाऊ असं नाही- रावसाहेब दानवे

सुरक्षा हटवल्याने आम्ही हादरून जाऊ असं नाही- रावसाहेब दानवे

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस, भाजप खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसे अधक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत राज्य सरकारने कपात केली आहे. या निर्णयावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

”राज्य सरकार ज्या भावनेनं काम करत आहे. वागत आहे. त्याचा उद्देश काय आहे, हे मला माहित नाही. त्यांनी अनेकांची सुरक्षा काढून घेतली आहे. आम्ही त्याबद्दल सरकारकडे दाद मागणार नाही. आमचं संरक्षण पोलीस करतात असं नाही. आमचं संरक्षण या राज्यातील जनता करतेय, असं रावसाहेब दानवे म्हणाले.

दरम्यान, सुरक्षा हटवल्याने आमच्या कामात कमीपणा येईल किंवा आम्ही हादरून जाऊ, असं नाही. सुरक्षा हटवण्याच कारण त्यांनाच माहिती आहे, असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला.

 महत्वाच्या घडामोडी-

“लोकप्रतिनिधींना सुरक्षेची गरज नाही, राज्य सरकारने हीच सुरक्षा जनतेला आणि महिलांना द्यावी”

खरं तर सत्तारांचे केसच उगवू देणार नव्हतो, पण…; रावसाहेब दानवेंचा अब्दुल सत्तारांनां टोला

“संभाजीनगर हा शिवसेनेचा विषय’; राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्याचं वक्तव्य”

“महाविकास आघाडीमध्ये पहिल्यापासूनच बिघाड, यांनी राज्याला बिघडवू नये”