Home महाराष्ट्र गरज नसल्यास माझी सुरक्षाही कमी करा- शरद पवार

गरज नसल्यास माझी सुरक्षाही कमी करा- शरद पवार

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस, भाजप खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसे अधक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत राज्य सरकारने कपात केली आहे. यावरून राजकीय वातावरण तापलं असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतःची सुरक्षा कमी करण्यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन केला. याबद्दल अनिल देशमुख यांनी याची माहिती दिली.

गरज नसल्यास माझी सुरक्षा कमी करण्यात यावी, असं पवार यांनी फोन करून सांगितलं. मात्र, एखाद्या व्यक्तीच्या जिवाला किती धोका आहे? यावरून सुरक्षा ठरवली जाते. नुकत्याच एका समितीच्या अहवालावरून अनेक नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विरोधी पक्षाचा आहे म्हणून सुरक्षा कमी केलेली नाही. समितीच्या अहवालानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.

 महत्वाच्या घडामोडी-

सुरक्षा हटवल्याने आम्ही हादरून जाऊ असं नाही- रावसाहेब दानवे

“लोकप्रतिनिधींना सुरक्षेची गरज नाही, राज्य सरकारने हीच सुरक्षा जनतेला आणि महिलांना द्यावी”

खरं तर सत्तारांचे केसच उगवू देणार नव्हतो, पण…; रावसाहेब दानवेंचा अब्दुल सत्तारांनां टोला

“संभाजीनगर हा शिवसेनेचा विषय’; राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्याचं वक्तव्य”