Home पुणे खरं तर सत्तारांचे केसच उगवू देणार नव्हतो, पण…; रावसाहेब दानवेंचा अब्दुल सत्तारांनां...

खरं तर सत्तारांचे केसच उगवू देणार नव्हतो, पण…; रावसाहेब दानवेंचा अब्दुल सत्तारांनां टोला

पुणे : शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी केलेल्या संकल्पाची आठवण करुन देत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पुन्हा अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधलाय.

“सत्तार यांनी आधी मला पाडल्याशिवाय डोक्यावरील केसं वाढवू देणार नाही, असं म्हटलं होतं. त्यामुळे मी त्यांचे खरं तर केसच उगवू देणार नव्हतो, पण मी त्यांची टोपी कधीच निघू देणार नाही, असा टोला रावसाहेब दानवेंनी अब्दुल सत्तार यांनां लगावला आहे.

अब्दुल सत्तार यांचं पहिलं वक्तव्य रावसाहेब दानवेंना पाडल्याशिवाय डोक्यावर केस उगवू देणार नाही असं होतं. तरीही दानवे निवडून आले. त्यानंतर आता त्यांनी ‘पण’ केला की दानवेंना पाडल्याशिवाय टोपी घालणार नाही. अब्दुल सत्तार माझे चांगले मित्र आहेत. बिचारे ते इतकं बोलतात, पण निवडणूक आली की माझंच काम करतात. त्यांच्या तालुक्यात माझी आणि माझ्या तालुक्यात त्यांची सासुरवाडी आहे. पण मी त्यांची टोपी कधीच निघू देणार नाही. चिंता करू नका, असं रावसाहेब दानवे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“संभाजीनगर हा शिवसेनेचा विषय’; राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्याचं वक्तव्य”

“महाविकास आघाडीमध्ये पहिल्यापासूनच बिघाड, यांनी राज्याला बिघडवू नये”

“बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिवशी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावं”

मुंबई तोडण्याचा काँग्रेसचा डाव यशस्वी होऊ देणार नाही- अतुल भातखळकर