Home पुणे राज साहेब, भाजपशी युती करा, निवडणुकीत फायदा होईल; पुण्यातील मनसे नेत्यांची मागणी

राज साहेब, भाजपशी युती करा, निवडणुकीत फायदा होईल; पुण्यातील मनसे नेत्यांची मागणी

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल पिंपरी-चिंचवडमध्ये सभा घेतली होती. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगरपालिका काबीज करण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आता मनसेच्या गोटातही हालचाली सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.

पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी मनसेनं भाजपशी युती करावी, असा आग्रह मनसेच्या स्थानिक नेत्यांनी धरला आहे. तसे केल्यास या निवडणुकीत मनसेला फायदा होईल, असं या पदाधिकाऱ्यांचे म्हणणं आहे.

दरम्यान, यामुळे आता राज ठाकरे यावर काय भूमिका घेणार, हे आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या घडामोडी –

शिवसेनेची बारामतीवर नजर! संजय राऊत म्हणतात…

रावसाहेब दानवेंमुळेच औरंगाबाद-जळगाव महामार्गाचं काम रखडलं- चंद्रकांत खैरे

“हर्षल पटेलची जबरदस्त हॅट्रिक! आरसीबीचा मुंबई इंडियन्सवर 54 धावांनी दणदणीत विजय”

पश्चिम महाराष्ट्राचं पाणी मराठवाड्याला आणणार; जयंत पाटलांनी सांगितला मास्टर प्लॅन