Home पुणे वेश्या व्यवसायाला प्रोफेशन म्हणून स्विकार करायला हवा; अमृता फडणवीसांची मागणी

वेश्या व्यवसायाला प्रोफेशन म्हणून स्विकार करायला हवा; अमृता फडणवीसांची मागणी

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : वेश्या व्यवसायाचा प्रोफेशन म्हणून स्विकार व्हायला हवा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी यावेळी केला.

मी सरकारला असंच सांगेन की, जसा इतर व्यवसायांना सन्मान असतो, त्याचप्रमाणे वेश्या  व्यवसायाला देखील आदर मिळाला पाहिजे. त्याला एक व्यवसाय म्हणून स्विकारलं पाहिजे., असं अमृता फडणवीस म्हणाल्या. त्या पुण्यात आज बुधवार पेठेतील महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर व मुलींसाठी सुकन्या कार्डचे वाटप कार्यक्रमात आल्या होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.

हे ही वाचा : …तर शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपला मतदान केलं असतं; खासदार नवनीत राणांचा धक्कादायक दावा

दरम्यान, जर्मनीसारख्या देशांमध्ये देहविक्री व्यवसाय करणाऱ्यांचं आदरणीय स्थान आहे. देहविक्री व्यवसाय करणारे या देशांमध्ये कर देखील भरतात. तेच स्थान आपण सर्वजण एकत्र आलो तर भारतात देखील मिळू शकतं. मी या निर्णयाच्या पाठीशी आहे, असंही अमृता फडणवीस म्हणाल्या.

महत्त्वाच्या घडामोडी –

औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्यांसमोर गुडघे टेकून काय मिळालं? मनसेचा शिवसेनेला सवाल

शिवसेना उमेदवाराच्या पराभवानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

महाविकास आघाडीला मोठा धक्का; कोल्हापूरात भाजपचे धनंजय महाडिक विजयी; शिवसेनेचे संजय पवार पराभूत