पृथ्वीराज चव्हाण यांना साताऱ्यात निवडून येण्यासाठी शरद पवारांची मदत घ्यावी लागते- संजय राऊत

0
182

मुंबई : शिवसेना खासदार व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून काॅंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीवर भाष्य करण्यात आले. राहुल गांधी यांना विरोध करणाऱ्या काँग्रेस नेत्यांचा सामनातून खरपूस समाचार घेण्यात आला आहे.

साताऱ्यात निवडून यायला पृथ्वीराज चव्हाणांना शरद पवारांची मदत घ्यावी लागते, असा निशाणाही  संजय राऊत यांनी सामनातून पृथ्वीराज चव्हाणांवर लगावला आहे.

पक्षात जमले नाही की भाजपात पळायचे हीच सध्या सक्रियता झाली आहे. हा नवा राजकीय कोरोना व्हायरस म्हणावा लागेल. सोनिया गांधी, राहुल गांधी यावर काय करणार? म्हणूनच पत्र पुढाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेस व्यापक पाठिंबा मिळू शकला नाही, असा टोला देखील संजय राऊतांनी लगावला आहे.

दरम्यान, देश संकटाच्या खाईत गटांगळ्या खात असताना काही लोकांना राजकारण सुचते कसे हा प्रश्नच आहे. कॉंग्रेसच्या 23 प्रमुख नेत्यांच्या पत्राने निर्माण केलेले वादळ तूर्त थंडावले आहे असं दिसतं. मुळात पक्षात वादळ निर्माण करण्याची क्षमता कॉंग्रेस पक्षातील एखाद्या नेत्यात तरी उरली आहे का? असा सवाल देखील संजय राऊतांनी यावेळी सामनातून केला.

महत्वाच्या घडामोडी-

गोड बातमी! विराट कोहलीच्या घरी नवीन पाहुण्याचं होणार आगमन; बनणार बाप

…तर आम्ही 2 तारखेला मशिदी उघडू; इम्तियाज जलीलांचा राज्य सरकारला इशारा

“नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली”

शिवसेनेच्या ‘या’ खासदाराने दिला राजीनामा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here