Home महाराष्ट्र “नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली”

“नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली”

मुंबई : ठाकरे सरकारकडून बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्यानं नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नावाचा समावेश आहे. तुकाराम मुंढे यांची मुंबईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.

राजकारण्यांच्या दबावापुढे न झुकता नियमानुसार काम करणे ही तुकाराम मुंढे यांची ओळख आहे. ज्या शहरात तुकाराम मुंढे आयुक्त म्हणून किंवा प्रशासकिय अधिकारी म्हणून बगेले, तिथं त्यांना स्थानिक नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधाचा सामना करावा लागला आहे.

नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी निवड झाल्यापासूनच मुंढे यांचे नगरसेवकांशी वाद सुरु झाला होता. सर्वपक्षीय नगरसेवकांचा तुकाराम मुंढे यांना विरोध होता. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच तुकाराम मुंढे यांच्या नावाला पसंती दिल्यामुळे महाविकासआघाडीतील नगरसेवकांना काही करता येत नव्हते.

दरम्यान, नागपुरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना तुकाराम मुंढे यांनी महापालिका आयुक्त म्हणून कडक निर्बंध घातले होते. मात्र यावरुनच महापौर आणि भाजप नेते संदीप जोशी यांच्याशी मुंढे यांचे तीव्र मतभेद पाहायला मिळाले.

महत्वाच्या घडामोडी-

शिवसेनेच्या ‘या’ खासदाराने दिला राजीनामा

घर घेणाऱ्यांसाठी ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

जो पक्ष स्वतःचा अध्यक्ष ठरवू शकत नाही तो पक्ष पुढचे निर्णय काय घेणार- देवेंद्र फडणवीस

गांधी कुटुंबाहेरील व्यक्ती काँग्रेस अध्यक्ष होऊ शकते; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचं वक्तव्य