Home महाराष्ट्र शिवसेनेच्या ‘या’ खासदाराने दिला राजीनामा

शिवसेनेच्या ‘या’ खासदाराने दिला राजीनामा

परभणी : शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे खासदारकीचा राजीनामा पाठवला आहे. तसेच त्यांनी राजीनाम्यासोबतच एक पत्रदेखील पाठवलं आहे.

परभणीत स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये मतभेद आहेत. राष्ट्रवादीकडून गळचेपी होत असल्याचा आरोप करत संजय जाधव यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवसेनेचे अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यासाठी संजय जाधव यांनी प्रचंड प्रयत्न केले. मात्र, बाजार समितीत पुन्हा राष्ट्रवादीचं अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आल्याने शिवसैनिकांवर अन्याय झाल्याची भावना संजय जाधव यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, याबाबत वेळोवेळी मुख्यमंत्र्यांसोबत बोलूनही शिवसेनेचं प्रशासक मंडळ नियुक्त न झाल्याने संजय जाधव नाराज झाले आहेत. स्थानिक शिवसैनिकांच्या इच्छा आपण पूर्ण करु शकत नसलो, आपल्या कार्यकर्त्यांना योग्यपणे न्याय देता येत नसेल तर मला खासदार म्हणून राहण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी भावना संजय जाधव यांनी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

घर घेणाऱ्यांसाठी ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

जो पक्ष स्वतःचा अध्यक्ष ठरवू शकत नाही तो पक्ष पुढचे निर्णय काय घेणार- देवेंद्र फडणवीस

गांधी कुटुंबाहेरील व्यक्ती काँग्रेस अध्यक्ष होऊ शकते; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचं वक्तव्य

“काँग्रेसच्या नाराज आमदारांशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चर्चा”