Home महाराष्ट्र …तर आम्ही 2 तारखेला मशिदी उघडू; इम्तियाज जलीलांचा राज्य सरकारला इशारा

…तर आम्ही 2 तारखेला मशिदी उघडू; इम्तियाज जलीलांचा राज्य सरकारला इशारा

मुंबई : औरंगाबादचे खासदार व अल्टिमेटम एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारने एक सप्टेंबरपासून मंदिरं उघडावीत, आम्ही दोन तारखेला सर्व मशिदी उघडू, असं म्हणत राज्य सरकारला इशारा दिला आहे.

आम्ही सर्व जण आपल्या वैद्यकीय पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी सहा महिने थांबलो आणि सरकारला सहकार्यही केले. आता सर्व काही उघडलेले असताना फक्त धार्मिक स्थळे का बंद ठेवली जात आहे? एक सप्टेंबरपासून सर्व मंदिरे उघडण्यासाठी महाराष्ट्र सरकारला माझा अल्टीमेटम आहे आणि आम्ही दोन सप्टेंबरपासून सर्व मशिदी उघडणार आहोत, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.

जेव्हा व्यवसाय, कारखाने, बाजारपेठा उघडल्या जातात, आणि बस, ट्रेन तसेच विमानाची उड्डाणे सुरु होतात, तेव्हा कोरोना फक्त धार्मिक स्थळांवर पसरेल, असं सरकारला कोणी सांगितलं? सरकारच्या उत्पन्नाचे साधन असलेल्या मद्यविक्रीची दुकानेही उघडली जातात आणि मर्यादित संख्येने लोक लग्नासाठी एकत्र येऊ शकतात, तर केवळ धार्मिक स्थळे बंद का? असा सवाल देखील इम्तियाज जलील यांनी यावेळी उपस्थित केला.

महत्वाच्या घडामोडी-

“नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली”

शिवसेनेच्या ‘या’ खासदाराने दिला राजीनामा

घर घेणाऱ्यांसाठी ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

जो पक्ष स्वतःचा अध्यक्ष ठरवू शकत नाही तो पक्ष पुढचे निर्णय काय घेणार- देवेंद्र फडणवीस