आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : भाजप नेते प्रसाद लाड यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. तसेच या भेटीनंतर आता आगामी महापालिका निवडणूकीत मनसे-भाजप एकत्र येणार का?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या भेटीनंतर प्रसाद लाड यांनी माध्यमांशी संवाद साधत या भेटीविषयी माहिती दिली.
हे ही वाचा : …म्हणून आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा; नितेश राणेंची मागणी
मुंबई जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भात ही भेट होती. सर्व पक्षाच्या नेतृत्वाने सहकार पॅनेल सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून बँकेची निवडणूक झाली पाहिजे हा सर्वांचा प्रयत्न होता. त्याबाबतीत राज यांच्याशी चर्चा केली, असं लाड म्हणाले.
दरम्यान, जेंव्हा दोन नेते एकत्र भेटतात तेव्हा राजकीय चर्चा होतेच. तशी आमच्यातही झाली, असं लाड म्हणाले. तसेच महापालिका निवडणुकीत एकत्र यायचं की नाही याचा निर्णय राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसच घेतील, असं सूचक विधान प्रसाद लाड यांनी केलं.
महत्वाच्या घडामोडी –
“संजय राऊत एक नंबरचे डबल ढोलकी, ममता बॅनर्जींसोबत मुंबईत, तर राहुल गांधींसोबत सुरात सूर मिसळतात”,
नवी मुंबईत बीएमडब्ल्यू गाडीच्या गोदामाला भीषण आग; 45 गाड्या जळून खाक
पवार कुटुंबच ओबीसी आरक्षणाचे कर्दनकाळ; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल