Home महाराष्ट्र प्राजक्तराज; अभिनेत्री प्राजक्ता माळीने सूरू केला ज्वेलरी ब्रँड, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची...

प्राजक्तराज; अभिनेत्री प्राजक्ता माळीने सूरू केला ज्वेलरी ब्रँड, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची विशेष उपस्थिती, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आपल्या अभिनयाने मराठी सिनेसृष्टीवर छाप सोडणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता माळीने आता अभिनयानंतर एक नवा उपक्रम हाती घेतला आहे. नुकताच तिने स्वतःचा ज्वेलरी ब्रँड सुरु केला आहे.

प्राजक्ताने याबाबत तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात तिने याबद्दलची माहिती दिली होती, मात्र अद्याप ब्रँडचे नाव सांगितले नव्हते. आज दिनांक 6 जानेवारी रोजी तिने आपल्या ‘प्राजक्तराज’ या ज्वेलरी ब्रँडचे उदघाटन केले. यासाठी तिने एक खास सोहळा आयोजित केला होता या सोहळ्याला राज ठाकरे त्यांच्या पत्नीसह उपस्थित होते.

हे ही वाचा : “काँग्रेसचा ‘हा’ मोठा नेता भाजपच्या वाटेवर?; पटोलेंच्या कार्यक्रमाला गैरहजर, फडणवीसांच्या कार्यक्रमाला उपस्थिती; चर्चांना उधाण”

राज ठाकरे यांनी प्राजक्ताच्या या उपक्रमाचे कौतुक केले. त्यानंतर राज यांनी भाषण केलं. ते म्हणाले, “तुम्हाला समजलं असेल, मी बायकोला का घेऊन आलो आहे. प्राजक्ता यांनी मला फोन करून या उपक्रमाबद्दल सांगितलं, तेंव्हा मी माझ्या पत्नीला सांगितले की, तू पण माझ्याबरोबर चल, मराठी संस्कृतीशी संबंधित असल्याने साहजिकच मी येणार, पण दागिने आणि माझा काही संबंध नाही म्हणून पत्नीबरोबर असणे गरजेचे आहे. मराठी संस्कृतीत अनेक गोष्टी मागे चालल्या आहेत. मी प्राजक्ता माळीचे आभार मानतो. त्यांनी या लोप पावलेल्या गोष्टी महाराष्ट्रापुढे आणल्या. त्या दागिन्यांनादेखील प्राजक्ता नावाचा ब्रँड हवा होता. आपल्याकडच्या अनेक गोष्टी आपण विसरलेलो आहोत.”

महत्त्वाच्या घडामोडी –

“ठाकरेंच्या ताकदीत वाढ; डोंबिवलीतील अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

“सांगलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद पेटला; शिवप्रेमींची पोलिसांसोबत झटापट”

जितेंद्र आव्हाड माफी मागा, नाहीतर…; औरंगजेबबाबत विधानावरून चित्रा वाघ यांचा आव्हाडांना इशारा