Home महाराष्ट्र ‘पेट्रोल-डिझेल सस्ता चाहीए की नहीं चाहीए?, असं विचारत सत्ता मिळवली; इंधन दरवाढीवरून...

‘पेट्रोल-डिझेल सस्ता चाहीए की नहीं चाहीए?, असं विचारत सत्ता मिळवली; इंधन दरवाढीवरून राऊतांचा टोला

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : वाढत्या इंधन दरवाढीवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा : “ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; राज्यातील हाॅटेल्स रात्री 12 पर्यंत, दुकाने रात्री 11 पर्यंत सुरू राहणार”

केंद्रामध्ये सत्तेत आलेल्या भाजपाने ‘पेट्रोल-डिझेल सस्ता चाहीए की नहीं चाहीए?’ असे सवाल निवडणुकींच्या प्रचार सभांतून उपस्थित करत सत्ता मिळवली. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात पेट्रोलच्या दराने साठी ओलांडल्यानंतर भाजपने आंदोलने केली होती, अशी आठवण करून देत राऊतांनी भाजपवर टीका केली आहे.

गेल्या तीन आठवड्यामध्ये तर तब्बल 16 वेळा पेट्रोल-डिझेलचे दर वाढले. लागोपाठ होणाऱ्या या दरवाढींमुळे देशभरातील जनमानस अस्वस्थ आहे. मागच्या आठवड्यात रविवारपर्यंत तर सलग चार दिवस पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढ केली आणि इंधनाच्या दरांनी भलताच उच्चांक गाठला, असं राऊत म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

भाजपला प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे; शिवसेनेच्या ‘या’ नेताचा आक्रमक पवित्रा

भाजपनं मनसेच्या नादी लागू नये, पुण्याचं महापाैरपद आम्हाला मिळालं पाहिजे- रामदास आठवले

मनसे इम्पॅक्ट ! विश्व करंडक टी-20चं समालोचन मराठीत