आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आज जम्मू-काश्मीरचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या चर्चेत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेही सहभागी झाल्या होत्या. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्यात शाब्दिक युद्ध पहायला मिळालं.
तुमच्या आई-वडिलांमुळेच तुम्ही इतक्या सक्षम झालात की आज संसदेमध्ये उभ्या आहात, असं सिंह यांनी यावेळी सुप्रिया सुळेंना उद्देशून म्हणाले. यावर सुप्रिया सुळे यांनी, आई-बाप काढायचे नाहीत. मला माझ्या पालकांचा फार अभिमान आहे., असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी सिंह यांना चांगलंच सुनावलं.
हे ही वाचा : देवेंद्र फडणवीसांनी नुरा कुस्ती खेळू नये, खऱ्या पैलवानासारखं मैदानात येऊन लढावं- प्रकाश आंबेडकर
दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये 5 हजार मुलांच्या शिक्षणाची काळजी घेणाऱ्या दिल्ली पब्लिक स्कुलला नोटीसा पाठवल्या जात आहेत. त्यांना त्रास दिला जातोय, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी यावेळी केला. तसेच अशा नोटीस पाठवून तुम्ही तिथल्या मुलांचं भलं करत आहात का? किती दिवस आपण इतिहासात अडकून बसणार? मागील 60 वर्षांत जे घडलं ते घडलं, पण पुढची किती वर्षे तुम्ही तेच बोलणार आहात. तेच ते ऐकून आता कंटाळा आला आहे. आता इतिहासात न अडकता भविष्याचा विचार करायला हवा, असा सल्ला सुप्रिया सुळे यांनी यावेळी केंद्राला दिला.
महत्वाच्या घडामोडी –
प्रविण दरेकरांनी आपलं आडनाव बदलून दरोडेखोर ठेवावं; काँग्रेस नेत्याची खोचक टीका
“काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादीला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यानं समर्थकांसह केला काँग्रेसमध्ये प्रवेश”
देवेंद्र फडणवीसांच्या नोटीसीविरोधातील आंदोलन भोवलं; भाजपच्या ‘या’ आमदारांसह 23 जणांवर गुन्हे दाखल,