Home महाराष्ट्र ‘देवेंद्र फडणवीसांचे सरकार आणा अन्…’- चंद्रशेखर बावनकुळे

‘देवेंद्र फडणवीसांचे सरकार आणा अन्…’- चंद्रशेखर बावनकुळे

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यात शेतकऱ्यांच्या वीज तोडणीच्या मुद्य्यावरून माजी ऊर्जामंत्री आणि भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

‘ऊर्जा मंत्रालयाने महाराष्टातील शेतकऱ्यांचे पुढील 3 वर्ष वीज कनेक्शन कापू नये, अशी आमची मागणी होती. पण महाविकास आघाडीने  लबाडी केली. पुढील तीन महिने वीज तोडणीची कारवाई थांबविण्याचा निर्णय घेतला. हे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. वीज तोडणीच्या संकटातून कायमचे मुक्त व्हायचे असेल तर महाराष्ट्रात पुन्हा देवेंद्र फडणवीसांचे सरकार आणावे लागेल’, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

हे ही वाचा : देवेंद्र फडणवीसांनी नुरा कुस्ती खेळू नये, खऱ्या पैलवानासारखं मैदानात येऊन लढावं- प्रकाश आंबेडकर

‘देवेंद्र फडणवीस सरकारने कधीही शेतकऱ्यांची वीज कापण्याचा विचार केला नव्हता. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार आले आणि दुर्दैवाने वीज तोडणी मोहीम राबविण्यात आली. आमच्या काळात 4 हजार 715 कोटींच्या नफ्यात असलेल्या विद्युत निर्मिती कंपन्या आज अंतर्गत भ्रष्टाचारामुळे डबघाईस आल्या आहेत, असंही चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, हा तोटा गरीब शेतकऱ्यांच्या खिशातून वसूल करण्यात येतो आहे. खरं बघता शेतकऱ्यांकडून वसुली करण्याचा अधिकार महाविकास आघाडीला नाही. तरीही वीज तोडणीची मोहीम सुरू असल्याची घणाघाती टीका बावनकुळे यांनी यावेळी केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

 प्रविण दरेकरांनी आपलं आडनाव बदलून दरोडेखोर ठेवावं; काँग्रेस नेत्याची खोचक टीका

“काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादीला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यानं समर्थकांसह केला काँग्रेसमध्ये प्रवेश”

देवेंद्र फडणवीसांच्या नोटीसीविरोधातील आंदोलन भोवलं; भाजपच्या ‘या’ आमदारांसह 23 जणांवर गुन्हे दाखल,