Home महाराष्ट्र प्रविण दरेकरांनी आपलं आडनाव बदलून दरोडेखोर ठेवावं; काँग्रेस नेत्याची खोचक टीका

प्रविण दरेकरांनी आपलं आडनाव बदलून दरोडेखोर ठेवावं; काँग्रेस नेत्याची खोचक टीका

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्याविरोधात मुंबई सहकारी बँक प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रविण दरेकरांवर निशाणा साधलाय.

मुंबई सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी बँकेचे माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा हा कायदेशीरच आहे. बँकेवर दरोडा टाकणाऱ्या दरेकर यांनी आता आडनाव बदलून दरोडेखोर असे करावे, अशी खोचक टीका नाना पटोले यांनी केली आहे.

हे ही वाचा : “राष्ट्रवादीचा शिवसेनेला मोठा दणका; कळव्यातील अनेक शिवसैनिकांनी हाती बांधलं घड्याळ”

मुंबई सहकारी बँकेची लूट करण्यात आली. लेखापरिक्षण अहवालात तसे स्पष्ट झाले आहे. सहकार विभागाला कारवाई करण्याचा अधिकार आहेत, त्यानुसार सहकार विभागाने ही कारवाई केलेली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई होते तेव्हा करेल तो भरेल असे म्हणणारे भाजपाचे नेते आता दरेकर प्रकरणावरून विनाकारण टीका करत आहेत. ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने केलेली नाही, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादीला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यानं समर्थकांसह केला काँग्रेसमध्ये प्रवेश”

देवेंद्र फडणवीसांच्या नोटीसीविरोधातील आंदोलन भोवलं; भाजपच्या ‘या’ आमदारांसह 23 जणांवर गुन्हे दाखल,

15 दिवसात बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडा, अन्यथा आम्ही पाडू; मुंबई महापालिकेकडून राणेंना तिसरी नोटीस