“राष्ट्रवादीचा शिवसेनेला मोठा दणका; कळव्यातील अनेक शिवसैनिकांनी हाती बांधलं घड्याळ”

0
336

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

ठाणे : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता राष्ट्रवादीनं शिवसेनेला मोठा दणका दिला आहे.

हे ही वाचा : “काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादीला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यानं समर्थकांसह केला काँग्रेसमध्ये प्रवेश”

कळव्यातील कारगील परिसरातील अनेक शिवसैनिकांनी पक्षाला धक्का देत राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. शिवसेना शाखाप्रमुख अक्षय अंकुश गुरव, उपशाखाप्रमुख रामअवतार यादव, संजय चौगुले, इस्माईल हक, दिलीप रजक, राहुल सिंग, संदीप शर्मा, नीतेश गौड, राहुल दुबे आणि राजेश राजभर या शिवसैनिकांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं.

दरम्यान, कळव्यातील वाघोबानगरमधील कारगील परिसरात 20 लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनासाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आले होते. यावेळी या शिवसैनिकांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

महत्वाच्या घडामोडी –

देवेंद्र फडणवीसांच्या नोटीसीविरोधातील आंदोलन भोवलं; भाजपच्या ‘या’ आमदारांसह 23 जणांवर गुन्हे दाखल,

15 दिवसात बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडा, अन्यथा आम्ही पाडू; मुंबई महापालिकेकडून राणेंना तिसरी नोटीस

हिंदुत्वासोबतच मराठी माणसाची मनसे पुन्हा दिसली पाहिजे; राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here