“बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या सातबाऱ्यावर फक्त आणि फक्त राज ठाकरे यांचंच नाव”

0
757

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

ठाणे : मातोश्रीच्या पीआर कार्डवर कोणाचही नाव असलं तरी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या सातबाऱ्यावर फक्त आणि फक्त राज ठाकरे यांचेच नाव आहे, असं वक्तव्य मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी केलं आहे.

हे ही वाचा :  “शिवसेनेसोबतच्या युतीबाबत प्रकाश आंबेडकरांचा मोठा खुलासा म्हणाले…; उद्धव ठाकरेंनी मला…”

मी 12 वर्षांपूर्वीच राज ठाकरे यांना म्हटलं होतं की, तुमची हिंदुत्वापासून सुटका नाही. जे हिंदुत्व मानणारे लोक होते, ते सगळे तुमच्या घराच्या सभोवताली आहे. तुमच्या घरापासून काही अंतरावर स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथेच आहे. बाळासाहेब ठाकरेंचं स्मृतीस्थळही तिथेच आहे. लतादीदींनीही येथूनच अखेरच्या प्रवासाला सुरूवात केली. सगळे कडवे हिंदुत्ववादी तुमच्या घराच्या भोवती आहेत. त्यामुळे हिंदुत्वापासून आता तुमची सुटका नाही, असं प्रकाश महाजन म्हणाले आहेत.

दरम्यान,  तुम्हाला हिंदुत्व घेऊनच वाटचाल करावी लागेल. तुमच्याशिवाय हिंदुत्वाला कोणीही वाली नाही, असंही प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे. ते मंगळवारी ठाण्यात मनसेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या उत्तरसभेत बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

जितेंद्र आव्हाडांनी तोंड बंद ठेवावं, अन्यथा…; मनसेचा इशारा

राज ठाकरे हे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असून ते…; चंद्रकांत पाटील

भाऊ दवाखान्यात दाखल झाल्याचं कळताच दोन्ही बहिणी धावल्या; तब्बेतीची केली विचारपूस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here