Home महाराष्ट्र 27 जानेवारीला पंकजाताईसोबत आम्ही सर्वजण उपोषणाला बसणार- प्रितम मुंडे

27 जानेवारीला पंकजाताईसोबत आम्ही सर्वजण उपोषणाला बसणार- प्रितम मुंडे

225

मुंबई :  आजच्या भाषणात पंकजाताईंनी आपली भुमिका मांडली आहे. 27 जानेवारीला पंकजाताई उपोषणाला बसणार आहेत. त्यांच्यासोबत आम्ही सर्वजण उपोषणाला बसणार आहोत, असं भाजपच्या खासदार प्रितम मुंडे यांनी म्हटलं आहे.

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी परळीतील गोपीनाथ गडावर समर्थकांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी मराठवाड्याच्या सिंचनाच्या प्रश्नावर लक्ष वेधून घेण्यासाठी जानेवारीमध्ये लाक्षणिक उपोषण करणार असल्याची मोठी घोषणा पंकजा मुंडे यांनी केली आहे.

27 जानेवारीला औरंगाबाद इथे हे उपोषण होणार आहे. हे उपोषण कुणाविरोधात नाही. तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी उपोषण करणार आहे, असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, आगामी काळात गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यभरातील प्रश्नांसाठी आपण संघर्ष करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

बंदी घालण्यात आलेल्या पॉर्न वेबसाईट पाहण्यासाठी नेटकऱ्यांचा नवा फंडा

“ताईसाहेब काळजी करू नका, महाविकास आघाडीचं सरकार मुंडे साहेबांचं स्मारक नक्की बांधेल”

“माझ्या डोळ्यातले अश्रू मी सुप्रिया सुळेंच्या डोळ्यात पाहिले”

आता ATM शिवायही काढता येणार पैसे; स्टेट बँकेंचा नवा उपक्रम