Home नांदेड शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदेंकडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापनेचा प्रस्ताव आला होता; ‘या’ मोठ्या नेत्याचा...

शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदेंकडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापनेचा प्रस्ताव आला होता; ‘या’ मोठ्या नेत्याचा गाैफ्यस्फोट

295

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेबाबत एक मोठा गाैफ्यस्फोट केला आहे.

राज्यात 2014-2019 च्या दरम्यान भाजप -शिवसेना युतीच्या काळातच युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षासोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून आला होता. हा प्रस्ताव घेऊन येणाऱ्या शिष्टमंडळात एकनाथ शिंदे यांचा समावेश होता, असा मोठा गाैफ्यस्फोट अशोक चव्हाण यांनी यावेळी केला.

हे ही वाचा : “जोपर्यंत निष्ठावान शिवसैनिक, तोपर्यंत शिवसेनेला काही होणार नाही”

शिवसेनेनं 2019 मध्ये भाजपसोबत निवडणूक लढवली. आता भाजसोबत युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करायची, या अनुषंगाने शिवसेनेचे वरिष्ठ नेते ज्यात सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता., असा खुलासा अशोक चव्हाणांनी यावेळी केला.

दरम्यान,  या सर्वांनी माझी मुंबईतील कार्यालयात भेट घेतली होती. त्यावेळी मी त्यांना, शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती करायची असेल तर अगोदर शरद पवार साहेबांशी चर्चा करा, असं मी त्यांना सांगितलं होतं. परंतु ते पवार साहेबांना पुढे भेटले किंवा नाही याबाबत मला नंतर काहीही माहिती नाही, असंही अशोक चव्हाणांनी यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

ठाण्यात शिवसेना गड कायम राखणार?; रश्मी ठाकरे, एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात; मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची गर्दी

पंकजाताईंचं राष्ट्रवादीत स्वागत…; ‘या’ मोठ्या नेत्याकडून पंकजा मुंडेंना थेट ऑफर

भाजपाचा राष्ट्रवादीला मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश