Home महाराष्ट्र “आता महाराष्ट्र-मुंबईतील देशी-ओवेसी कोण? ते लवकरच कळेल”

“आता महाराष्ट्र-मुंबईतील देशी-ओवेसी कोण? ते लवकरच कळेल”

मुंबई : खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षावर सातत्यानं भाजपची बी टीम असल्याचा आरोप राजकीय वर्तुळातून होत असतो. भाजपविरोधी पक्षाकडून केल्या जाणाऱ्या या आरोपाला भाजप खासदारानं अप्रत्यक्षपणे दुजोरा दिल्यानं हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यावरून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून भाजपसह असदुद्दीन ओवेसी यांना खडेबोल सुनावले आहेत.

ओवेसी साहेबांची पोलखोल भारतीय जनता पक्षानेच केल्याने काही प्रमाणात दूध का दूध आणि पानी का पानी झाले आहे. ओवेसी मियाँचे ‘एमआयएम’ पात्र हे मुसलमानांचे तारणहार नसून, भारतीय जनता पक्षाचे अंगवस्त्र असल्याच्या शंका लोकांना होत्याच, पण भाजपाचे प्रमुख नेते साक्षी महाराज यांनी आता ठणकावून खरे सांगितले आहे की, होय, मियाँ ओवेसी हे भाजपचेच पाॅलिटिकल एजंट असून ओवेसीच्या मदतीनेच आम्ही निवडणुका जिंकत असतो, असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

दरम्यान, साक्षी महाराज म्हणतात, ओवेसी मदतीला होते म्हणून आम्ही बिहार जिंकले. आता ओवेसीसाहेब आम्हाला प. बंगाल आणि उत्तर प्रदेशातही मदत करतील. ओवेसींची मदत भाजपास होते ही भगवंताचीच कृपा आहे. परवरदिगार भगवंत ओवेसींना अधिकाअधिक शक्तिमान करो! साक्षी महाराजांनी भाजपचे अंतरंगच उघडून दाखवले, असं म्हणत सामनातून भाजपवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“त्यावेळी धनंजय मुंडेंना शिवीगाळ करणारे मनीष धुरी आज त्यांच्या पाठीशी”

ग्रामपंचायत वादातून भाजप कार्यकर्त्याची हत्या; संतप्त ग्रामस्थांचं पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार राज्यव्यापी लसीकरणाचा शुभारंभ

“भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्याच्या वडिलांचं निधन”