“सामनाचं नाव आता पाकिस्ताननामा किंवा बाबरनामा करा”; शेलारांची संजय राऊतांवर टीका

0
409

मुंबई : पाकिस्ताननिर्मितीचे गुन्हेगार हे फक्त महात्मा गांधींना ठरवून नथुराम गोडसेंनी गांधींवर गोळ्या झाडल्या. गांधींना मारण्यापेक्षा बॅ. जीनांवर हा प्रयोग झाला असता तर फाळणीचा स्मृतीदिन साजरा करण्याची वेळ आली नसती.”, असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या रोखठोकमध्ये म्हटलंय. याला भाजपा नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलंय.

संजय राऊत यांनी कितीही प्रयत्न केला तरी या देशाचा वेगळा इतिहास लिहिण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना त्यांनी बळ देण्याचा हा प्रयत्न आहे. जीना यांनी फाळणी केली याबद्दल दुमत असण्याचं कारणच नाही. गोळीबार, हल्ला किंवा खून गाधीजींचा याचं कुणी समर्थन करण्याचा विषयच नाही, असं आशिष शेलारांनी म्हटलं आहे.

संजय राऊत, विपर्यासाचं विच्छेदन करून सत्याला लपवता येत नाही. भारतीय लोकांच्या फाळणीच्या आठवणींना एक अर्थाने इतिहासातून धडा घेऊन, नवा इतिहास घडवण्यासाठीचा तो दिवस पंतप्रधान मोदींनी घोषित केला तर, पाकिस्तानच्या पोटात दुखायला लागलं आणि जे पाकिस्तानच्या पोटात दुखायला लागलं. त्याच पद्धतीच्या भावना संजय राऊत रुपी संपादकाच्या हातून सामनात उतरायला लागल्या. त्यामुळे सामनाने आता नाव बदलून टाकावं, सामनाने त्याचं नाव पाकिस्तान नामा किंवा बाबरनामा करावं, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“नारायण राणेंना ‘पब्लिसिटी स्टंट’चा मोह आवरता आला नाही”

‘या’ तालुक्यात भाजप-शिवसेना युती कायम; भाजप खासदाराची माहिती

“उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं निधन”

…तेंव्हा राज ठाकरेंना शरद पवारांबद्दल कळलं नाही का?; हसन मुश्रीफांचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here