फडणवीसांना नाही तर चंद्रकांतदादांना घाई, पण त्यांचं नाव यादीतही नाही; जयंत पाटलांचा टोला

0
373

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : पुणे महापालिकेची निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महापालिका इमारतीशेजारी नवे कार्यालय उभारलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत या कार्यालयाचे उद्घाटन पार पडलं. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्य केलं होतं.

हे ही वाचा : “अखेर महाराष्ट्रात ओम्रिकाॅन व्हेरियंटची एन्ट्री; ‘या’ शहरात आढळला पहिला रूग्ण”

‘आपल्या सगळ्यांचे नेते ज्यांनी लवकरात लवकर महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं असं स्वप्न आपण पाहतो आहोत, आणि जागेपणी पाहत आहोत. त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करत आहोत. लोकांचे आशीर्वाद मिळवत आहोत, असे आपले सर्वांचे लाडके नेते माननीय देवेंद्र फडणवीस’, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. यावरून आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देत टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीसांना कोणतीही घाई नाही. चंद्रकांत पाटलांनाच घाई झाली आहे. फडणवीसांचं नाव पुढे करुन ते बोलत आहेत. मात्र, त्यांना तिथे बसायचं आहे. असं असलं तरी त्यांचं नाव यादीतही नाही, असा उपरोधक टोला जयंत पाटलांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

“कंगणा रणाैत आता निवडणुकीच्या रिंगणात?; करणार ‘राष्ट्रवादी’चा प्रचार”

अखेर ठरलं! सांगली जिल्हा बँकेचं अध्यक्षपद राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याकडे, तर कदम ठरवणार काँग्रेसचा उपाध्यक्ष!

मुंबईत भाजप-शिवसेना नगरसेवकांमध्ये जोरदार राडा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here