Home महाराष्ट्र मराठा आरक्षण मिळेपर्यंत भरती नकोच, आणि केली तर…; मनोज जरांगे पाटील यांचा...

मराठा आरक्षण मिळेपर्यंत भरती नकोच, आणि केली तर…; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी मुंबई : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा उद्या म्हणजेच शनिवारी मुंबईत मोर्चा धडकणार आहे. मात्र, मुंबई पोलिसांनी आझाद मैदान, शिवाजीपार्क येथे संचारबंदी जाहीर केली आहे.

त्यामुळे जरांगे पाटील मुंबईत येणार की नाही याची साशंकता आहे. अशातच सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची वाशी येथे भेट घेतली. त्यांच्यासोबत चर्चा केली. या चर्चेनंतर जरांगे पाटील यांनी सभा घेतली. या सभेत जरांगे पाटलांनी सरकारवर निशाणा साधला.

ही बातमी पण वाचा : ‘मराठा आरक्षणावर राज्यपालांचं मोठं वक्तव्यं, म्हणाले…’

सरकारने नोकर भरती करू नये आणि केलीच तर आमच्या जागा राखीव ठेवा, असं जरांगे पाटील म्हणाले. ज्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत त्यांच्या कुटुंबाला प्रमाणपत्र मिळावे असं, जरांगे पाटील म्हणाले. सामान्य प्रशासनाचे सचिव म्हणतात, 54 लाख नव्हे तर 57 लाख नोंदी मिळाल्या. मधला मराठ्यांचा दणका बसला आणि त्यात या नोंदी वाढल्या. 54 लाख नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र द्या. सरकारच्या म्हणण्यानुसार 37 लाख लोकांना प्रमाणपत्र दिलंय. 54 लाखातील काही लोकांची वंशावळीतील आडनावे नाहीत. त्यासाठी तालुका स्तरावर समिती स्थापन केली. हे लोक वंशावळी जुळवणार आहेत असं जरांगे पाटलांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, क्युरेटिव्ही पीटीशनचा विषय सुप्रीम कोर्टात आहे. ते आरक्षण मिळेपर्यंत आणि सग्या सोयऱ्यांच्या माध्यमातून जर एखादा मराठा राहिला. जुळलं नाही तर ते 100  टक्के आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला जगातलं 100 टक्के शिक्षण मोफत करण्यात यावं अशी आपली मागणी आहे. या मुद्द्यावर सरकारने सांगितलं की, राज्यातील मुलींना केजी टू पीजी शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. पण फक्त मुलींनाच शिक्षण देणार. मुलांना दिले सोडून. खुट्टी ठोकलीच. त्यामुळे मोफत शिक्षणाचा जीआर आज रात्रीपर्यंतच काढा, अशी मागणी जरांगे पाटील यांनी यावेळी केली.

महत्त्वाच्या घडामोडी – 

कंगना भाजपमधून निवडणूक लढणार? भाजप उपाध्यक्षांचं मोठं वक्तव्यं

भाजप म्हणते ‘हिंदू खतरे में’ तर मग तुम्ही…; प्रकाश आंबेडकरांची भाजपावर टीका

“मोठी बातमी! खासदार संजय राऊत यांच्या भावाला ईडीकडून समन्स”