Home देश बिहारच्या मुख्यमंत्रीपदी होण्याचा मान नितीश कुमारांना; उद्या घेणार शपथ

बिहारच्या मुख्यमंत्रीपदी होण्याचा मान नितीश कुमारांना; उद्या घेणार शपथ

पाटणा : संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांना पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री होण्याचा मान मिळणार आहे. उद्या म्हणजे सोमवारी ते बिहारचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.

आज पाटण्यात झालेल्या एनडीएच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. तर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या म्हणजेच सोमवारी सकाळी 11.30 वाजता शपथविधी पार पडणार असून नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

दरम्यान, 1985 साली प्रथम निवडून आलेले आमदार नितीशकुमार यांनी 6 वेळा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. उद्या सातव्यांदा ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. यापूर्वी त्यांनी पहिल्यांदा 2000 साली 3 मार्च ते 10 मार्च या 7 दिवसांसाठी मुख्यमंत्री पद भूषवले होते.

महत्वाच्या घडामोडी-

अभिनेत्री दिशा पटाणी लाल बिकीणीत मालदीवच्या किनारी; चाहते म्हणाले नोव्हेंबर HOT करून टाकलास

संजय राऊतांकडून ओबामांविषयी नाराजी, निलेश राणे म्हणतात, “आता ओबामांचं काही खरं नाही”

“एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण”

रामाचं राज्य येऊनही कोरोनाचा रावण मारला जात नाही; संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला