कणकवली : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एका व्यक्तीला 12 कोटींचा गंडा घातलेला आहे. त्यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तुरुंगात टाकणार होते, पण नारायण राणे भाजपला शरण गेले, असं धक्कादायक वक्तव्य शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केलं आहे. कणकवलीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
शिवसेना आणि राणे कुटुंबात राजकीय वैर आहेत. दोन्ही बाजूंनी सातत्यानं आरोप प्रत्यारोप होताना बघायला मिळतात. अशातच आता विनायक राऊत यांनी नितेश राणे यांच्याबद्दल धक्कादायक गाैफ्यस्फोट केला आहे.
दरम्यान, नितेश राणे यांनी नवी मुंबईत एका व्यक्तीला 12 कोटींना गंडा घातला होता. या प्रकरणाची भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली होती. या प्रकरणी फडणवीस हे नितेश राणेंना तुरुंगात टाकणार होते. पण नारायण राणे भाजपला शरण गेले. त्यामुळे ती केस थांबली. आम्ही मनात आणलं, तर ती केस एका दिवसात ओपन होऊ शकते. ती केस ओपन झाली, तर दुसऱ्याच महिन्यात नितेश राणे तुरुंगात गेल्याशिवाय राहणार नाहीत, असं म्हणत विनायक राऊतांनी नितेश राणेंना यावेळी इशारा दिला.
महत्वाच्या घडामोडी-
गरज नसल्यास माझी सुरक्षाही कमी करा- शरद पवार
सुरक्षा हटवल्याने आम्ही हादरून जाऊ असं नाही- रावसाहेब दानवे
“लोकप्रतिनिधींना सुरक्षेची गरज नाही, राज्य सरकारने हीच सुरक्षा जनतेला आणि महिलांना द्यावी”
खरं तर सत्तारांचे केसच उगवू देणार नव्हतो, पण…; रावसाहेब दानवेंचा अब्दुल सत्तारांनां टोला