मुंबई : पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटींचे वाटप अर्थमंत्र्यांनी असे ‘पटापट’ केले की, पट्टीचा अर्थतज्ञही चाट पडावा, असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामना पेपरच्या अग्रलेखातून अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
सामना पेपरच्या अग्रलेखातून केंद्राच्या 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेज वर टीका. मुळात चप्पल चोरांना अर्थ विषय कळण्यातला नाही, असं म्हणत निलेश राणेंनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं.
दरम्यान, कर्ज देण्यापेक्षा मजुरांच्या हातात पैसे द्या पण किती महिने आणि वर्ष न काम करता पैसे द्यायचे? दुसरं चीन आहे मग भारताला संधी कशी मिळणार..काय म्हणणार ह्यांना?, असं निलेश राणे म्हणाले.
सामना पेपरच्या अग्रलेखातून केंद्राच्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेज वर टीका. मुळात चप्पल चोरांना अर्थ विषय कळण्यातला नाही, म्हणे कर्ज देण्यापेक्षा मजुरांच्या हातात पैसे द्या पण किती महिने/वर्ष न काम करता पैसे द्यायचे? दुसरं चीन आहे मग भारताला संधी कशी मिळणार..काय म्हणणार ह्यांना?
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 15, 2020
महत्वाच्या घडामोडी-
…तर माझा भरोसा तुम्ही धरू नका; एकनाथ खडसेंचा भाजपला इशारा
20 लाख कोटींचे वाटप अर्थमंत्र्यांनी असे ‘पटापट’ केले की, पट्टीचा अर्थतज्ञही चाट पडावा- संजय राऊत
चंद्रकांत पाटलांनी कोल्हापूर जिल्ह्यातील माणसं जगली का मेली ते तरी बघायला यावं- हसन मुश्रीफ
एकनाथ खडसेंच भाजपसाठी फार मोठं योगदान; त्यांच्यावर अशी वेळ येणं फार दुर्भाग्याची गोष्ट- नितीन गडकरी