Home महाराष्ट्र 20 लाख कोटींचे वाटप अर्थमंत्र्यांनी असे ‘पटापट’ केले की, पट्टीचा अर्थतज्ञही चाट...

20 लाख कोटींचे वाटप अर्थमंत्र्यांनी असे ‘पटापट’ केले की, पट्टीचा अर्थतज्ञही चाट पडावा- संजय राऊत

मुंबई : पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटींचे वाटप अर्थमंत्र्यांनी असे ‘पटापट’ केले की, पट्टीचा अर्थतज्ञही चाट पडावा, असं असलं तरीही पंतप्रधानांनी निर्मला सीतारामन यांचे तोंडभरून केलं, आसं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्यावर निशाणा साधला आहे.

मोदींनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटींचे वाटप कसे होणार याची फोड अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. म्हणजे अर्थशास्त्रीय भाषेत रुपया कसा खर्च होणार त्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली आहे.  20 लाख कोटी ही साधी रक्कम नाही. या 20 लाख कोटींचा हिशोब अर्थमंत्र्यांनी मांडताच पहिल्या पाच मिनिटांत शेअर बाजार घसरला, तो अद्यापि सावरू शकलेला नाही, असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, अशा प्रकारचे मोठे आर्थिक पॅकेज जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारात घसरून आपटलेला हिंदुस्थान हा पहिला देश असावा. याचा अर्थ असा की, 20 लाख कोटी प्रत्यक्ष उद्योग क्षेत्रात अवतरतील काय? याबाबत कॉर्पोरेट जगतात शंका आहे. उद्योगांत विश्वास निर्माण करण्याची क्षमता देशाच्या अर्थमंत्र्यांमध्ये आहे काय?, असा सवालही राऊत यांनी अग्रलेखातून केला.

महत्वाच्या घडामोडी-

चंद्रकांत पाटलांनी कोल्हापूर जिल्ह्यातील माणसं जगली का मेली ते तरी बघायला यावं- हसन मुश्रीफ

एकनाथ खडसेंच भाजपसाठी फार मोठं योगदान; त्यांच्यावर अशी वेळ येणं फार दुर्भाग्याची गोष्ट- नितीन गडकरी

उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड; ‘या’ दिवशी होणार शपथविधी

“नरेंद्र मोदींनी जाहीर केलेलं पॅकेज फक्त रोजगार वाचवणारे नाही तर वाढवणारे”