Home महाराष्ट्र “नरेंद्र मोदींनी जाहीर केलेलं पॅकेज फक्त रोजगार वाचवणारे नाही तर वाढवणारे”

“नरेंद्र मोदींनी जाहीर केलेलं पॅकेज फक्त रोजगार वाचवणारे नाही तर वाढवणारे”

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करण्याबरोबर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी 20 लाख कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. यावर विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस यांनी पॅकेजबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त केलं आहे.

नरेंद्र मोदी यांनी आज पॅकेजचा जो पहिला टप्पा घोषित केला, त्यामुळे लघु आणि मध्यम उद्योगांना मोठा दिलासा मिळणार आहे. हे पॅकेज अभूतपूर्व आहे आणि केवळ रोजगार वाचविणारे नाही, तर नवीन रोजगारनिर्मिती करणारे पॅकेज ठरेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त म्हटलं आहे.

हे पॅकेज नवभारताच्या निर्मितीला चालना देणारे आहे. एमएसएमई क्षेत्रासाठी मोठी आणि भरीव तरतूद यात करण्यात आली आहे. यातून या क्षेत्राला 25 टक्के अतिरिक्त खेळते भांडवल उपलब्ध होणार असून, त्याची संपूर्ण हमी केंद्र सरकारने घेतली आहे. तीन लाख कोटी रूपये या क्षेत्राला उपलब्ध होणार आहेत. या कर्जाची मुदत चार वर्षांची असून, त्यात एक वर्षाची सवलत सुद्धा आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन शिथील करण्याची हिम्मत दाखवावी- देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस सज्जन माणूस, त्यांनी छाती फाडून दाखवायची का?, चंद्रकांत पाटलांचा खडसेंना सवाल

आर्थिक पॅकेजची घोषणा भविष्यात पोकळ ठरू नये- बाळासाहेब थोरात

…तर 105 आमदारांचे 50 व्हायला वेळ लागणार नाही- एकनाथ खडसे