Home महाराष्ट्र एकनाथ खडसेंच भाजपसाठी फार मोठं योगदान; त्यांच्यावर अशी वेळ येणं फार दुर्भाग्याची...

एकनाथ खडसेंच भाजपसाठी फार मोठं योगदान; त्यांच्यावर अशी वेळ येणं फार दुर्भाग्याची गोष्ट- नितीन गडकरी

मुंबई : भाजपानं विधान परिषद निवडणुकीसाठी उमेवारांची घोषणा केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी पक्षाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. उमेदवारांच्या नावांची घोषणा झाल्यानंतर त्यांनी आपली भूमिका मांडली. यावरच पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी भाष्य केलं आहे.

एकनाथ खडसे यांचं भाजपसाठी फार मोठं योगदान आहे. पक्षाच्या वाढीसाठी त्यांनी फार हाल अपेष्टा सोसून पक्ष वाढीसाठी त्यांनी काम केलं आहे. पण त्यांच्यावर आता अशी वेळ येणं फार दुर्भाग्याची गोष्ट आहे, असं नितीन गडकरी म्हणाले.

दरम्यान, मी मार्गदर्शकाच्या भूमिकेत होतो आणि यापुढेही कायम राहिल ज्या काळात भाजपाच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होत होतं, त्या काळात आम्ही निवडून येत होतो, अशी भावना एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली होती. त्याच भावनांची गडकरींनी कदर केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड; ‘या’ दिवशी होणार शपथविधी

“नरेंद्र मोदींनी जाहीर केलेलं पॅकेज फक्त रोजगार वाचवणारे नाही तर वाढवणारे”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन शिथील करण्याची हिम्मत दाखवावी- देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस सज्जन माणूस, त्यांनी छाती फाडून दाखवायची का?, चंद्रकांत पाटलांचा खडसेंना सवाल