Home महाराष्ट्र चंद्रकांत पाटलांनी कोल्हापूर जिल्ह्यातील माणसं जगली का मेली ते तरी बघायला यावं-...

चंद्रकांत पाटलांनी कोल्हापूर जिल्ह्यातील माणसं जगली का मेली ते तरी बघायला यावं- हसन मुश्रीफ

कोल्हापूर : चंद्रकांत पाटील यांची मी मुलाखत पाहिली आहे. यामध्ये दोन तीन वेळा कोल्हापूरचा उल्लेख आला आहे. गेल्या 50 दिवसात कोल्हापूरची माणसं काय करत आहेत, ती जगली का मेली हे सुध्दा बघायला पाटील आलेले नाहीत, शब्दांत, असं म्हणत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंदकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

ज्या कोल्हापूर जिल्ह्यानं पदवीधरच्या निवडणुकीत दोन वेळा आमदार केलं, नंतचर ते मंत्री झाले, कोल्हापूरचे ते भूमीपूत्र आहेत. त्यांनी कोरोनामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील माणसं जगली का मेली ते तरी बघायला यावं, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

आम्ही सत्तेवर असतो तर यापेक्षा अधिक चांगलं काम केलं असतं असं म्हणणाऱ्या पाटील यांनी पहिल्यांदा कोल्हापुरात यावं. सर्व पातळ्यांवर कोल्हापूर जिल्ह्यात कसं चागलं काम सुरू आहे ते पहावं, असंही हसन मुश्रीफ म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट आणि डॉक्टर असोसिएशन यांच्यावतीने अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना फेस शील्डचे शासकीय विश्रामगृहावर वितरण करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते

महत्वाच्या घडामोडी-

एकनाथ खडसेंच भाजपसाठी फार मोठं योगदान; त्यांच्यावर अशी वेळ येणं फार दुर्भाग्याची गोष्ट- नितीन गडकरी

उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड; ‘या’ दिवशी होणार शपथविधी

“नरेंद्र मोदींनी जाहीर केलेलं पॅकेज फक्त रोजगार वाचवणारे नाही तर वाढवणारे”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन शिथील करण्याची हिम्मत दाखवावी- देवेंद्र फडणवीस