Home महत्वाच्या बातम्या मोठी बातमी! ‘या’ कारणासाठी ठाकरे – शिंदे गट आले पुन्हा एकत्र; राजकीय...

मोठी बातमी! ‘या’ कारणासाठी ठाकरे – शिंदे गट आले पुन्हा एकत्र; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कल्याण | एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांची साथ सोडून भाजपची साथ धरली. यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झालं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेत शिंदे सातत्याने शह देत होते. एकमेकांविरोधात हे शह काटशहाचे राजकारण सुरू असतानाच एक महत्वाची बातमी समोर आलीय.

ही बातमी पण वाचा : “पंतप्रधानांबद्दलचं ‘ते’ विधान भोवलं; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याला लोकसभेतून केलं निलंबित”

उध्दव ठाकरे आणि शिंदे यांच्यामधील कटूता संपविण्याच्या दृष्टिने पदाधिकारी आणि शिवसेना आमदाराने एक महत्वाचं पाऊल टाकलं आहे. कल्याण येथील पारनाका भागात भूमीपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता येथील एका भूमिपूजनच्या कार्यक्रमात हे दोन्ही गट एकत्र आले आहेत.

दरम्यान, शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर, कल्याण शहर प्रमुख तसेच उद्धव ठाकरे गटाचे उपशहर संघटक, शाखा प्रमुख आणि अनेक शिवसैनिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले होते.

महत्त्वाच्या घडामोडी –

फडणवीस, शेलार आमच्या मालकांकडे समर्थनासाठी चपला घासतात; मनसे नेत्याचं केंद्रीय मंत्र्याला जोरदार प्रत्युत्तर

…तर मंत्रालयातील सचिव कार्यालयात साप सोडणार; बच्चू कडूंचा इशारा

शरद पवारांमध्ये, पंतप्रधान होण्याची क्षमता, मात्र…; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं विधान