नवी दिल्ली : देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरण्याची शक्यता असलेली 59 चायनीज मोबाईल अॅपवर बंदी घालाण्यचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामध्ये TikTok आणि Helo या लोकप्रिय अॅप्सचा समावेश आहे.
देशाच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम 69 A च्या अंतर्गत ही बंदी घातली आहे. चीनकडून सायबर अटॅकची भीती गेले काही दिवस व्यक्त करण्यात येत होती. त्यावर उपाय म्हणून या चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, देशवासीयांची सायबर स्पेस सुरक्षित राहावी, यासाठी हा निर्णय घेत असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर मोबाईल अॅप्स आणि इंटरनेट वापरताना कोणती काळजी घ्यावी, डाऊनलोड करताना कुठली माहिती द्यावी याबाबत भारत सरकारने निवेदन जारी केलं आहे.
बंदी घालण्यात अलेल्या अॅप्सची यादी
महत्वाच्या घडामोडी-
अजित पवार भेटतात का? ते नाराज आहेत का?; फडणवीस म्हणाले….
महाराष्ट्रात लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवला; ‘या’ गोष्टी राहणार बंधनकारक
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमच्याबाबत खालच्या दर्जाचे बोलत होते तेव्हा…; देवेंद्र फडणवीसांचा सवाल
पेट्रोल–डिझेल दरवाढीने मध्यमवर्गीयांचं कंबरडं मोडलं- सतेज पाटलांची केंद्र सरकारवर टीका