Home महत्वाच्या बातम्या महाराष्ट्रात लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवला; ‘या’ गोष्टी राहणार बंधनकारक

महाराष्ट्रात लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवला; ‘या’ गोष्टी राहणार बंधनकारक

180

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. मात्र मिशन बिगीन अगेन अंतर्गत टप्याटप्याने शिथीलता दिली जाणार आहे.

ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होईल, त्या ठिकाणी संबंधित जिल्हाधिकारी किंवा पालिका आयुक्त अनावश्यक सेवांवर ठराविक भागात निर्बंध घालू शकतात, असंही यात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सध्याचा लॉकडाऊन 30 जूननंतर उठणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. तसेच हा लॉकडाऊन आहे तसा न राहता टप्प्याटप्प्याने यात काही सवलती दिल्या जातील, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

‘या’ गोष्टींना परवानगी

  • सायकलिंग, धावणे, चालणे अशा व्यायामांना परवानगी देण्यात आली आहे. सकाळी 5 ते संध्याकाळी 7 या वेळेत खाजगी किंवा सार्वजनिक मैदाने, समुद्र किनारे, बाग इत्यादी ठिकाणी व्यायामाला मुभा असणार आहे.
  • केवळ इनडोर स्टेडियममध्ये परवानगी नाही.
  • सामुहिक (ग्रुप) अ‌ॅक्टिविटीजना परवानगी नाही.
  • लहान मुलांसोबत पालकांना थांबणे अनिवार्य असणार आहे.
  • केवळ जवळच्या ठिकाणी व्यायाम करण्यास जाण्याची सूचना, मोकळ्या जागेतील गर्दीची    ठिकाणे टाळावी.
  • सायकलिंग करण्यास अधिक प्रोत्साहन, यातून शारीरिक व्यायामासोबत सोशल डिस्टन्सिंग पाळले जाते.
  • प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल अशा तंत्रज्ञांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर याचा वापर करुन काम करावे, गॅरेजची वेळ घेऊन वाहन दुरुस्ती कामे करावीत.
  • ‘या’ गोष्टी बंधनकारक1. मास्क घालून चेहरा झाकणे अनिवार्य
    2. सोशल डिस्टन्सिंग – सार्वजनिक ठिकाणी सहा फूट (दो गज) अंतर राखणे बंधनकारक
    3. दुकानात पाचपेक्षा जास्त ग्राहकांची गर्दी होणार नाही, याची काळजी दुकानदारांनी घ्यावी
    4. लग्नाला 50 पेक्षा जास्त पाहुणे नाही, तर अंत्ययात्रेला 50 पेक्षा जास्त माणसांची गर्दी नाही
    5. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा दंडनीय अपराध
    6. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, पान, तंबाखू याचे सेवन निषिद्ध

महत्वाच्या घडामोडी-

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमच्याबाबत खालच्या दर्जाचे बोलत होते तेव्हा…; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

पेट्रोल–डिझेल दरवाढीने मध्यमवर्गीयांचं कंबरडं मोडलं- सतेज पाटलांची केंद्र सरकारवर टीका

“वा रे मोदी तेरा खेल…” इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक; देशभरात आंदोलन

…तरच मुंबई-पुण्याची गर्दी कमी होईल; संजय राऊतांचा गडकरींना टोला