Home महाराष्ट्र अजित पवार भेटतात का? ते नाराज आहेत का?; फडणवीस म्हणाले….

अजित पवार भेटतात का? ते नाराज आहेत का?; फडणवीस म्हणाले….

197

अकोला : विदर्भ दौऱ्यावर असलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अकोल्यातील पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा अजित पवारांबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली.

अजित पवार नाराज आहेत अशी चर्चा आहे, ते तुम्हाला आता भेटतात का? अजित पवार सध्या राजी की नाराजी? यावर मी काय बोलू. याबाबत शरद पवारच सांगू शकतील, मी काय सांगू? असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, सत्तास्थापनेबाबत राष्ट्रवादीने थेट ऑफर दिली होती मात्र पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी ऐनवेळी भूमिका बदलल्याचा दावा फडणवीस यांनी केला होता. तसंच अजित पवारांसोबतच्या शपथविधीबाबतही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं होतं.

महत्वाच्या घडामोडी-

महाराष्ट्रात लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवला; ‘या’ गोष्टी राहणार बंधनकारक

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमच्याबाबत खालच्या दर्जाचे बोलत होते तेव्हा…; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

पेट्रोल–डिझेल दरवाढीने मध्यमवर्गीयांचं कंबरडं मोडलं- सतेज पाटलांची केंद्र सरकारवर टीका

“वा रे मोदी तेरा खेल…” इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक; देशभरात आंदोलन