सोलापुरात राष्ट्रवादीची ताकद वाढणार; शरद पवारांच्या उपस्थितीत ‘हा’ मोठा नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश?

0
1221

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सोलापूर : आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज सोलापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत. आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणूक आयोग कोणाच्या नेतृत्वाखाली लढायच्या याबाबतचा निर्णय ते घेणार आहेत.

सोलापूर महापालिका निवडणूक कुणाच्या नेतृत्वात लढायची याचा निर्णय शरद पवार घेणार असल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच शिवसेनेचे महेश कोठे हे आजच पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. त्यांच्यासोबत असंख्य समर्थकही राष्ट्रवादीत येण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, काँग्रेस, शिवसेना करत राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेले महेश कोठे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका निवडणुका लढविली जाणार असल्याची चर्चाही रंगली आहे. मात्र याला पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा विरोध नसला तरी थोडीफार नाराजी आहे. या नेत्यांनी नाराजी दूर करून पवार निर्णय घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

जिल्हा परिषद – पंचायत समिती पोटनिवडणुकांमध्ये जनतेनं भाजपला जमिनीवरच ठेवलं; संजय राऊतांचा टोला

चिपी विमातळाच्या श्रेयावरून भाजपची पोस्टरबाजी; शिवसेनेला डिवचलं

राष्ट्रवादीचा भाजपला दणका; भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

चिपी विमानतळाच्या निमंत्रण पत्रिकेत उद्धव ठाकरेंचे नाव पहिल्या स्थानावर, तर राणेंचे तिसऱ्या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here