Home महाराष्ट्र जिल्हा परिषद – पंचायत समिती पोटनिवडणुकांमध्ये जनतेनं भाजपला जमिनीवरच ठेवलं; संजय राऊतांचा...

जिल्हा परिषद – पंचायत समिती पोटनिवडणुकांमध्ये जनतेनं भाजपला जमिनीवरच ठेवलं; संजय राऊतांचा टोला

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : जिल्हा परिषद – पंचायत समिती पोटनिवडणुकांवरुन शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधलाय.

महाविकास आघाडने जिल्हा परिषद – पंचायत समिती पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला धूळ चारत चांगली कामगिरी केला. याचा अर्थ असा की, जनतेने भाजपला जमिनीवरच ठेवले आहे. महाविकास आघाडीने बाजी मारली हे मान्य करायला मनाचा मोठेपणा लागतो. राज्यातील विरोधी पक्षाकडे तेवढे विशाल मन उरले आहे काय? असा सवाल करत संजय राऊत यांनी विरोधी पक्षावर निशाणा साधलाय.

महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचे निकाल आले आहेत. प्रत्येक जण आपापल्या सोयीने या निकालांचे अर्थ लावीत आहे. आम्हीच कसे ‘मोठे’ किंवा लोकांनी आमच्याच डोक्यावर कसा विजयाचा मुकुट ठेवला असं सांगण्याची चढाओढ सुरू आहे. त्या चढाओढीत भारतीय जनता पक्षाने नेहमीप्रमाणे आघाडी घेतली असली तरी कागदावरील निकालांचे आकडे खोटे बोलत नाहीत, असं अग्रलेखातून म्हटलं आहे.

पंचायत समिती निवडणुकांत राज्यातील महाविकास आघाडीने 144 पैकी 73 जागांवर विजय मिळविला. भाजपास 33 जागा जिंकता आल्या. आता गणितात कोणत्या आर्यभट्टाने किंवा भास्कराचार्याने 73 पेक्षा 33 आकडा मोठा असे सिद्ध केले ते ‘सरशी’वाल्यांनी सांगावे. तर जिल्हा परिषद निवडणुकांतही महाविकास आघाडीस 43 तर भाजपला 22 जागा मिळाल्या. आता 46 हा आकडा भाजपच्या 22 पेक्षा दुप्पट असे कोणताही ‘गणिती’ सांगेल. इतिहासाचे धडे बदलले जात आहेत तसे बीजगणित, भूमितीची प्रमेयेसुद्धा बदलली जात आहेत काय? या काही सरसकट निवडणुका नव्हत्या हे समजून घेतले पाहिजे. न्यायालयाच्या निर्णयामुळे या निवडणुकांना सामोरे जावे लागले, अशी माहितीही शिवसेनेनं दिली.

महत्वाच्या घडामोडी –

चिपी विमातळाच्या श्रेयावरून भाजपची पोस्टरबाजी; शिवसेनेला डिवचलं

राष्ट्रवादीचा भाजपला दणका; भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

चिपी विमानतळाच्या निमंत्रण पत्रिकेत उद्धव ठाकरेंचे नाव पहिल्या स्थानावर, तर राणेंचे तिसऱ्या क्रमांकावर

शिवसेनेचा भाजपला धक्का; दिवंगत खासदार डेलकरांच्या पत्नी, मुलाच्या हाती शिवबंधन