राष्ट्रवादीचे भाजपच्या नगरसेवकांना फोडण्याचे स्वप्न भंगले; भाजपच्या ‘या’ नेत्याची टीका

0
378

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : येत्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून फोडाफोडीचे राजकारण करून भाजपच्या नगरसेवकांना फोडण्याचा निर्धार राष्ट्रवादीने केला होता. मात्र राष्ट्रवादीचे दिवास्वप्न भंगले असून.’मुंगेरीलाल के हसीन सपने’ असेच त्याचे वर्णन करावे लागेल, अशी टीका भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.

हे ही वाचा : मोठी बातमी! राज ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट; एसटी कर्मचाऱ्यांचा संप लवकरच मिटण्याची शक्यता

राज्यातील जनता ठाकरे सरकारच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळली आहे. सरकारविरोधात जनतेच्या मनात प्रचंड राग आहे. गेल्या दोन वर्षात राज्य सरकारने पुण्यात कोणतेही काम केले नाही. भाजपच्या नगरसेवकांना हे सर्वच माहिती आहे. पुणेकरांचा विश्वास भाजपने केलेल्या विकासकामांवर असून शहराचा विकास करण्यासाठी आवश्यक दूरदृष्टी आणि क्षमता भाजपमध्ये आहे. त्यामुळेच सर्व पक्षाशी एकनिष्ठ राहणार आहे, असं जगदीश मुळीक म्हणाले .

दरम्यान, पुणे महानगर नियोजन समितीच्या सदस्यपदाच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भाजपने 22 पैकी 14 जागांवर बाजी मारली आहे. भाजपने उभे केलेले सर्व उमेदवार विजयी झाल्याने पक्षाच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.

महत्वाच्या घडामोडी –

कोणाच्याही इच्छेने महाविकास आघाडीचे सरकार पडणार नाही; जयंत पाटलांचा भाजपला इशारा

पुण्यात राष्ट्रवादीची आक्रमक भूमिका; वादग्रस्त वक्तव्यप्रकरणी कंगनाच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन

“राज ठाकरे घेणार शरद पवार यांची भेट; एसटी कामगारांचा संप मिटणार?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here