बीड पालिकेतील सर्वच जागा राष्ट्रवादी जिंकणार; राष्ट्रवादीच्या आमदारांचा निर्धार

0
222

बीड : आगामी निवडणुकीत पालिकेत सत्ता परिवर्तन नक्की होईल आणि बीड पालिकेतील सर्वच 52 नगरसेवक राष्ट्रवादीचे विजयी होतील, असा दावा आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला आहे.

नगरपरिषद निवडणुकीसाठी 40 दिवसांच्या नियोजनाचा आराखडा तयार केला आहे. या नियोजनातून विधानसभेच्या निवडणुकीत ज्या कार्यकर्त्यांनी खांद्याला खांदा  लावून, पायी शहरभर माझ्यासोबत फिरणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम आपण सर्वजण करणार आहोत, असं संदीप क्षीरसागर म्हणाले आहेत.

हे ही वाचा : भाजप नेत्याने महिलेला फसवलं, हॉटेलमधील व्हिडीओ आला समोर

बीडमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे हे आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून सिद्ध करून दाखवायचे आहे. ज्यांनी प्रामाणिकपणे अडचणीच्या काळात साथ दिली आहे, पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले आहेत अशांना यावेळी संधी देऊन न्याय दिला जाईल. ज्यांना संधी मिळालेली नाही त्यांनी पुढील निवडणुकीसाठी आतापासूनच तयारी करावी, असंही संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, बीड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार क्षीरसागरांच्या अध्यक्षतेखाली काल कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“कठीण प्रसंगातही शिवसेनेत इनकमिंगचा धुमधडाका सूरू; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं समर्थकांसह हाती बांधलं शिवबंधन”

गद्दारी का झाली?; आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

शिवसेनेकडून हकालपट्टीचं सत्र सूरूच, आता आणखी 2 बंडखोर आमदारांची पक्षातून हकालपट्टी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here