Home महाराष्ट्र शिवसेनेकडून हकालपट्टीचं सत्र सूरूच, आता आणखी 2 बंडखोर आमदारांची पक्षातून हकालपट्टी

शिवसेनेकडून हकालपट्टीचं सत्र सूरूच, आता आणखी 2 बंडखोर आमदारांची पक्षातून हकालपट्टी

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.

यानंतर आता शिवसेनेत उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे असे दोन गट पडले आहेत. तसेच शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंनी या बंडखोरांना परत येण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र यात यश न आल्यानं शिवसेनेनं आता एक मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांची हिंगोलीच्या जिल्हा प्रमुखपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. यानंतर आता आणखी 2 बंडखोर आमदारांची शिवसेनेकडून हकालपट्टी करण्यात आली आहे.

हे ही वाचा : मंत्री, संत्री कोणी पण होऊ देत, सगळ्यांचा सात-बारा माझ्याकडे, करेक्ट कार्यक्रम करणार- जयंत पाटील

पालघर जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक आणि पालघर जिल्हाप्रमुख राजेश शहा यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळं शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. , तशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही, पण…; उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांना भावनीक आवाहन

अमित ठाकरेंचं फुटबॉल कौशल्य पाहिलतं का; जगलिंग करतानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

शिवसेनेचे 12 खासदार भाजपच्या संपर्कात; रावसाहेब दानवेंचं मोठं वक्तव्य