Home महाराष्ट्र गद्दारी का झाली?; आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

गद्दारी का झाली?; आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 40 आणि अपक्ष 10 आमदार यांच्यासोबत मिळून शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.

शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. एकाच वेळी 40 आमदार सोडून गेल्याने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा पक्षबांधणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेच्या माध्यमातून जनतेशी आणि शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ही गद्दारी का झाली, याचं उत्तर आदित्य ठाकरेंनी यावेळी दिलं.

महाविकास आघाडी सरकार सुरळीत सुरू असताना, काही जणांना महाराष्ट्राबाबत पोटदुखी होती. महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल होतंय, महाराष्ट्र पुढे चाललंय, हे काही लोकांना बघवलं नाही, त्यामुळे गद्दारी झाली,  असं आदित्य ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा : शिवसेनेकडून हकालपट्टीचं सत्र सूरूच, आता आणखी 2 बंडखोर आमदारांची पक्षातून हकालपट्टी

सगळीकडेच लोकांचं प्रेम आणि आशीर्वाद शिवसेनेसोबत आहेत. सामान्य नागरिक असतील किंवा राजकीय लोक असतील, त्यांना माहीत आहे, शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंबप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला गेला होता. त्यामुळे सगळीकडेच शिवसैनिकांचं प्रेम आणि आशीर्वाद पाहायला मिळत आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

दरम्यान, जे अराजकीय लोक आहेत ते देखील महाराष्ट्रात जे सर्कस झालं, त्यावर लक्ष ठेवून होते. आम्ही महाराष्ट्रात फिरत आहोत. ही प्रेम यात्रा आहे, निष्ठा यात्रा आहे. आम्ही लोकांना भेटत आहोत, कुणावरही आरोप करत नाही ना कुणावर टीका करत आहोत, असं आदित्य ठाकरेंनी यावेळी म्हटलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

मंत्री, संत्री कोणी पण होऊ देत, सगळ्यांचा सात-बारा माझ्याकडे, करेक्ट कार्यक्रम करणार- जयंत पाटील

तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही, पण…; उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांना भावनीक आवाहन

अमित ठाकरेंचं फुटबॉल कौशल्य पाहिलतं का; जगलिंग करतानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल