नारायण राणेंचा झाला लोकसभेत घोटाळा; नारायण राणेंनी केली ‘ही’ चुक, सभापतींनी कसं निस्तारलं?

0
652

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : लोकसभा असो की विधानसभा. अनेक गमती-जमती होताना आपण पाहतो. तसाच एक धमाल किस्सा घडला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केरळच्या खासदाराला चक्क तामिळनाडूचे उत्तर दिले. शेवटी सभापती महोदयांनी ही चूक लक्षात आणून दिली. त्यानंतर राणेंचा चेहरा पाहण्यासारखा झाला.

केरळचे खासदार सुरेश कोडीकुन्नील यांनी एक प्रश्न विचारला. तसेच कोरोनाकाळात उद्योगांचे प्रचंड नुकसान झाले. या काळात सरकारने काय मदत केली. याचे सविस्तर उत्तर देण्याचे आवाहन केले. त्यावर, माननीय अध्यक्ष महोदय. कोरोनाच्या महामारीचा गेल्या दोन वर्षांत उद्योग क्षेत्रावर गंभीर परिणाम झाला. त्यामुळे अनेक उद्योग बंद पडले. काही सुरूही झाले. मात्र, आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रमांतर्गत अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यानुसार आतापर्यंत 2 लाख 80 हजार कोटी रुपये कोरोनाचा फटका बसलेल्या उद्योगांसाठी खर्च केले गेले. नुकसान झालेल्या उद्योगांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या. त्यातून आम्हाला तामिळनाडूमध्येही अनेक उद्योगकांना त्यांचे उद्योग सुरू करण्यासाठी मदत झाली आहे. त्यांना कर्ज दिले. सबसिडी दिली. त्यामुळे तामिळनाडूमध्ये जितके उद्योग होते ते पुन्हा एकदा सुरू झाले. असं केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले.

हे ही वाचा : पर्पल कॅप विजेता हर्षल पटेलवर लागली ‘इतक्या’ कोटींची बोली; RCB नं घेतलं आपल्या ताफ्यात

नारायण राणेंनी दिलेल्या उत्तरावर सभापती महोदयांनी हरकत घेतली. सुरेश कोडीकुन्नील हे केरळचे आहेत, असं सभापती महोदयांनी यावेळी सांगितलं, त्यानंतर तुम्ही तामिळनाडू समजून घ्या, असा उल्लेख करत राणेंनी पुन्हा गडबड केली. त्यानंतर सभापतींनी केरळ म्हणत त्यात पुन्हा सुधारणा केली आणि पुढला प्रश्न पटलावर घेतला.

दरम्यान, यापू्र्वीही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा लोकसभेतील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ‘डीएमके’च्या नेत्या कनिमोझी यांनी नारायण राणे यांना त्यांच्या खात्याबद्दल इंग्रजीमध्ये प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे नारायण राणे यांना नीट उत्तर देता आले नव्हते.

महत्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी: जळगाव न्यायालयात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह इतर चौघांची निर्दोष मुक्तता

“श्रेयस अय्यरवर लागली तब्बल ‘इतक्या’ कोटींची बोली; KKR नं घेतलं आपल्या ताफ्यात”

“चेन्नईचा ‘हा’ आक्रमक खेळाडू आता खेळणार RCB कडून; तब्बल ‘इतके’ कोटी देऊन RCB संघात सामील”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here