Home महाराष्ट्र नारायण राणेंना बाळासाहेबांनी अक्षरश: हाकलून दिलं होतं; शिवसेनेच्या ‘या’ नेत्यानं सांगितला जुना...

नारायण राणेंना बाळासाहेबांनी अक्षरश: हाकलून दिलं होतं; शिवसेनेच्या ‘या’ नेत्यानं सांगितला जुना प्रसंग

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं. यानंतर ठाकरे गटाकडून शिंदे गटावर सातत्यानं गद्दारी उल्लेख केला जात आहे. अशातच याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली होती.

शिंदे गटाने गद्दारी केली नाही तर, उद्धव ठाकरे यांनीच शिवसेना आमदार आणि पक्षाशी खरी गद्दारी केली. त्यांनी गद्दारी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं, अशी टीका राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली होती. यावरून आता शिवसेनेचे माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : “उद्धव ठाकरेंची मोठी खेळी; वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसचा ‘हा’ मोठा नेता हाती बांधणार शिवबंधन”

नारायण राणेसारख्या माणसाने महाराष्ट्रातील जनतेला गद्दारी कुणी केली? याबाबत शिकवू नये. बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांना अक्षरश: हाकलून दिलं होतं. मातोश्रीच्या जीवावर मोठं झालेल्या राणेसारख्या लोकांनी म्याव म्याव करू नये, असा हल्लाबोल शिवाजीराव चोथे यांनी यावेळी केला. ते जालन्यात एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

राणे हा शिवसेनेतून हाकलून दिलेला माणूस आहे, हे साऱ्या महाराष्ट्राला माहीत आहे. बाळासाहेबांनी राणेंना अक्षरश: हाकलून दिलं होतं. त्या बैठकीला मी स्वत: उपस्थित होतो. शिवसेनेतून हाकलून दिल्यानंतर त्या माणसानं एक संघटना आणि मग भाजपात प्रवेश केला. त्यामुळे अशा माणसानं उद्धव ठाकरेंबद्दल बोलणं फारसं उचित आहे, असं मला वाटत नाही. बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव उद्धव ठाकरे हे खऱ्या अर्थानं बछडा आहेत, असा घणाघातही चोथे यांनी यावेळी केला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

शिवतीर्थावर शिवसेनेचा म्हणजे आमचा दसरा मेळावा होणार- उद्धव ठकरे

मोहित कंबोज यांच्या आरोपानंतर रोहित पवार मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला, देवेंद्र फडणवीसही हजर; चर्चांना उधाण

रोहिणी खडसे आल्या, तसंच तुम्हीही राष्ट्रवादीत या; राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराची पंकजा मुंडेंना ऑफर