Home महाराष्ट्र नारायण राणे म्हणाले, मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले नकोत; आता मनोज जरांगेंचं राणेंना...

नारायण राणे म्हणाले, मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले नकोत; आता मनोज जरांगेंचं राणेंना प्रत्युत्तर, म्हणाले…

मुंबई : गेल्या १७ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आमरण उपोषण मनोज जरांगे पाटलांनी आज स्थगित करून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.

उपोषण सोडलं असलं तरीही मराठ्यांना सरसकट कुणबी जातप्रमाणपत्रच्या मागणीसाठी जरांगे पाटील आग्रही आहेत. त्यांच्या या मागणीवर भाजप नेते नारायण राणे यांनी आक्षेप घेतला आहे.

मराठ्यांना सरसकट आरक्षण न देता आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी राणेंनी केली आहे. यावर मनोज जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

ही बातमी पण वाचा : …तर त्यावेळी मी भाजपमध्ये गेले असतो; दीपक केसरकर यांचं मोठं वक्तव्य

सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, ही आमची मागणी आहे. कुणबी जात प्रमाणपत्र घ्यायचं की नाही हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. या आरक्षणामुळे गोरगरीब मराठा समाजातील पोराचं कल्याण होणार आहे. ज्यांना शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण लागतं तर ते कुणबी प्रमाणपत्र काढू शकतात. हे प्रमाणपत्र घेतलंच पाहिजे, ही जबरदस्ती नाही. प्रमाणपत्र कोणी घरात आणून देणार नाहीय. तुम्ही गेलात तर ते देणार आहेत. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र लागू झालं तर कोणावरही जबरदस्ती करण्यात येणार नाही. ज्यांना आवश्यक आहे, अस्तित्व टिकवण्यासाठी मराठ्यांची गोरगरीब पोरं जातप्रमाणपत्र घेऊ शकतात. ही यामागची मूळ भूमिका आहे, असं मनोज जरांगांनी यावेळी स्पष्ट केली.

महत्त्वाच्या घडामोडी –

“जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार, चकमकीत कर्नल, मेजर आणि डीएसपी शहीद”

मोठी बातमी! कल्याण-डोंबिवलीत पुन्हा भाजप-शिंदे गटात पुन्हा धुसफूस; नेमकं काय घडतंय?

…तर या सरकारला ते महागात पडेल; मराठा महासंघाचा शिंदे – फडणवीस सरकारला इशारा