Home देश “जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार, चकमकीत कर्नल, मेजर आणि डीएसपी शहीद”

“जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार, चकमकीत कर्नल, मेजर आणि डीएसपी शहीद”

181

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कारवाया सातत्याने सुरुच आहेत. या दहशतवाद्यामुळे आज जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय सैन्याच्या कर्नलसह सुरक्षा दलाचे तीन जवान शहीद झाले आहेत.

याबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग भागात ही चकमक झाली. गोळीबारात कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष, जम्मू-काश्मीर पोलिसांचे उपअधीक्षक (डीएसपी) हुमायून भट गंभीर जखमी झाले होते. नंतर त्यांचा मृत्यू झाला. जास्त रक्तस्त्राव झाल्याने भट यांचा मृत्यू झाल्याचंही अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! कल्याण-डोंबिवलीत पुन्हा भाजप-शिंदे गटात पुन्हा धुसफूस; नेमकं काय घडतंय?

संयुक्त पथक घनदाट जंगलातून जात असताना दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. सुरुवातीला जे स्फोट आणि गोळीबार झाले त्यातच तिघांचा मृत्यू झाला. गोळीबार इतका तीव्र होता की संयुक्त पथकाला प्रतिक्रिया देण्यासाठी फारसा वेळ मिळाला नाही. दहशतवाद्यांनी सतत गोळीबार केला, ज्यामुळे जखमी अधिकाऱ्यांना लवकर बाहेर काढण्यात अडथळा निर्माण झाला.

महत्त्वाच्या घडामोडी –

…तर या सरकारला ते महागात पडेल; मराठा महासंघाचा शिंदे – फडणवीस सरकारला इशारा

शिवसेनेच्या या नेत्याच्या अडचणीत वाढ; बलात्कार प्रकरणातील जामीन रद्द

मोठी बातमी! महाराष्ट्र सरकारकडून कुणबी-मराठा आरक्षणाचा जीआर निघाला