आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेनेत गळती सूरू झाली आहे. अजूनही स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. अशातच कोकणातील शिवसेना आमदार राजन साळवी शिंदे गटात सामील होणार?, या चर्चांनी जोर धरला असताना स्वत:प्रतिक्रिया देत या चर्चा फेटाळल्या आहेत.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पायाशी माझी निष्ठा आहे. मी त्यांच्याशीच प्रामाणिक आहे आणि अखेरपर्यंत शिवसेनेतच राहणार, असं म्हणत साळवींनी उद्धव ठाकरेंवरची आपली निष्ठा दाखवून दिली आहे.
हे ही वाचा : राष्ट्रवादीच्या 5 मोठ्या नेत्यांना ईडीची नोटीस येणार, ‘या’ भाजप खासदाराचं मोठं वक्तव्य
मागील 40 वर्षे मी शिवसेनेसाठी निष्ठेने काम करत आहे. शिवसैनिक, नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हाप्रमुख, तीन वेळेचा आमदार आणि उपनेता म्हणून मी जबाबदाऱ्या पार पाडल्या. पण माझी निष्ठा उद्धव ठाकरेंच्या पायाशी आहे. मी प्रामाणिकपणे ठाकरेंसोबत आहे. मी खुलासा करतोय.. मरेपर्यंत उद्धवसाहेब, आदित्य साहेबांसोबत काम करणार आहे. तोच माझा अंत आहे, अशी ग्वाही साळवींनी यावेळी दिली.
महत्त्वाच्या घडामोडी –
भाजपच्या ‘या’ नेत्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल होणार, दिल्ली हायकोर्टाचे आदेश
नागपुरात शिवसेनेला मोठा धक्का, ‘या’ नेत्याचा राजीनामा; शिंदे गटात सामील होणार?