मुनगंटीवार म्हणाले, पहाटेचा शपथविधी उद्धव ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी, आता राज ठाकरेंचा थेट हल्लाबोल, म्हणाले…

0
344

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अंबरनाथ : भाजपचे नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी, पहाटेच्या शपथविधीवर भाष्य करताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

भाजपने उद्धव ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी अजित पवार यांच्याबरोबर पहाटे शपथविधी घेतल्याचं वक्तव्य मुनगंटीवार यांनी केलं. यानंतर त्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ही बातमी पण वाचा : कर्नाटक निवडणूकीवरून राज ठाकरेंचा, भाजपला टोला, म्हणाले…

भाजपकडून चूक झाली, ती झाली. त्यांनी उगाच कुणाला धडे शिकवायला जाऊ नये. भाजपने या सर्व गोष्टी केल्या आणि त्यानंतर महाराष्ट्रात हे सर्व राजकारण झालं. त्यामुळे भाजपच्या आत्ताच्या सारवासारवीला काही अर्थ नाही., असा टोला राज ठाकरेंनी यावेळी लगावला. ते अंबरनाथमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

महत्त्वाच्या घडामोडी –

कर्नाटक निवडणूकीवरून राज ठाकरेंचा, भाजपला टोला, म्हणाले…

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला दिलेला कौल हा..; अजित पवारांचा भाजपवर हल्लाबोल

“मोठी बातमी! पराभवानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी दिला राजीनामा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here