“मुंबई उच्च न्यायालयाचा अर्णव गोस्वामींना दणका”

0
177

मुंबई : टीआरपी प्रकरणात मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करावा किंवा हा गुन्हा तपासासाठी सीबीआय कडे वर्ग करावा, अशी मागणी करणारी याचिका पत्रकार अर्णव गोस्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. यावर आज सुनावणी झाली.

मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा हा रद्द करता येणार नाही, त्याचप्रमाणे सीबीआयकडे ही वर्ग करण्याची आवश्यकता नाही, असं मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं आहे.

दरम्यान, मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून त्या तपासामध्ये तुम्ही सहकार्य करावे, असे आदेशही न्यायालयाने अर्णव गोस्वामी यांना दिले आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी थिल्लरबाजी करु नये; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

घोषणा देणारे गेले, आम्ही प्रत्यक्षात काम करू; उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला

रविंद्र जडेजाची एकाकी झुंज; चेन्नईचे राजस्थानसमोर विजयासाठी 126 धावांचे लक्ष्य

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाता कामा नये अन्यथा…; नवनीत राणांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here