Home महाराष्ट्र घोषणा देणारे गेले, आम्ही प्रत्यक्षात काम करू; उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला

घोषणा देणारे गेले, आम्ही प्रत्यक्षात काम करू; उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला

मुंबई : राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. यावर आता उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांना धारेवर धरलं आहे.

शेतकरी आणि आपत्तीग्रस्त हे संकटाच्या डोंगराखाली अडकलेले आहेत, त्या लोकांना दिलासा आणि धीर देण्यासाठी आम्ही इथं आलोय, सरकारकडून जे जे काही करणे आवश्यक आहे ते लोकांसाठी आम्ही करू, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच घोषणा देणारे गेले आम्ही प्रत्यक्षात काम करू, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

दरम्यान, परतीच्या पावसाचं संकट अजून टळलं नाही. आणखी काही दिवस अतिवृष्टी होऊ शकते असा इशारा हवामान खात्याने दिला आहे, त्यामुळे नुकसान किती होतंय याचा अंदाज आला आहे,  त्यामुळे सरकार लवकरच मदत करेल, अशी ग्वाही देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

रविंद्र जडेजाची एकाकी झुंज; चेन्नईचे राजस्थानसमोर विजयासाठी 126 धावांचे लक्ष्य

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाता कामा नये अन्यथा…; नवनीत राणांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

चेन्नई सुपर किंग्सने टाॅस जिंकला; प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

शरद पवार शेतीच्या बांधावर जाणार नाहीत तर मग काय बंगल्यात बसून राहतील का?; गुलाबराव पाटलांचा विरोधकांना सवाल