Home महाराष्ट्र “राहुल गांधींविरोधात आंदोलन करणं मनसेला भोवलं; ‘या’ मोठ्या नेत्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात”

“राहुल गांधींविरोधात आंदोलन करणं मनसेला भोवलं; ‘या’ मोठ्या नेत्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. मात्र या दौऱ्यात आज दुसऱ्यांदा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. यावरून आता मनसे आक्रमक झाली आहे.

सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांचा निषेध करण्यासाठी राज्यभरातील मनसे सैनिकांनी शेगावला जावे, असे थेट आदेशच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार मनसेचे कार्यकर्ते औरंगाबादमार्गे शेगावकडे निघाले आहेत. पण त्यांचा ताफा पोलिसांनी मधेच चिखली नाक्यावर अडवला आहे. त्यामुळे मनसे कार्यकर्ते या ठिकाणी राहुल गांधींविरोधात जोरदार घोषणाबाजी देत आहेत.

हे ही वाचा : राहुल गांधींच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, म्हणाले…

मनसे नेते संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. यामुळे पोलिसांनी संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई यांना ताब्यात घेतलं. तसेच इतर मनसैनिकांची धरपकड केल्यामुळे मनसैनिकांनी जोरदार निदर्शने केली आहेत.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“राज ठाकरेंच्या आदेशानंतर आता कार्यकर्ते आक्रमक, राहुल गांधींच्या सभेआधी मनसैनिक लोकेशनवर”

उद्धव ठाकरेंवर टीका करताना, आमदार रवी राणांची जीभ घसरली, म्हणाले…

भाजपचा राष्ट्रवादीला दे धक्का; ‘या’ नेत्यासह अनेकांनी केला भाजपमध्ये प्रवेश